कलर्सवर प्रसारित होणाऱ्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमधील भांडणं हा तर साऱ्यांसाठीच मनोरंजनाचा विषय आहे. घरातील आपल्या वागण्यामुळे प्रत्येका चीच एक प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात तयार झाली आहे. याचदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अर्शी हितेनला भोपाळची वैशिष्ट्ये सांगत असते. ती हितेनला म्हणते की, तुम्ही एकदा तरी भोपाळला यायला हवं कारण ती दिल्लीची राजधानी आहे. त्यानंतर विकास तिला दिल्लीची राजधानी कोणती असा प्रतिप्रश्न विचारतो. विकासच्या या प्रश्नावर अर्शी त्याला भोपाळ असे उत्तर देते. तिच्या या उत्तरानंतर विकास आणि घरातील इतर सदस्य पोट धरून हसायला लागतात. यानंतर आपण चुकीचं उत्तर दिलं याची तिला जाणीव होते आणि ती स्वतःही हसू लागते.यानंतर विकास तिला सोनं, लोहं आणि कापूस यांच्यामध्ये सर्वात जड वस्तू कोणती असा प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं उत्तर देताना अर्शी लोहं म्हणते तर हिना खान सोनं असं उत्तर देते. तर दुसरीकडे चंद्र, मंगळ आणि प्लुटो यामधील सर्वात मोठा ग्रह कोणता या प्रश्नाचे उत्तर अर्शी चंद्र असे देते. तिच्या या उत्तरावर घरातील सगळेच स्पर्धक जोरजोरात हसू लागतात. ज्युपिटर, नेप्च्युन आणि सूर्य या तिघांपैकी सर्वात मोठं कोण आहे या प्रश्नाचे उत्तर देताना अर्शी म्हणाली की, तिने या तिघांपैकी एकही सिनेमा पाहिला नाही. तिच्या या उत्तरानंतर तर घरातले पोटधरून हसू लागतात.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews